पैठण,दिं.२१.(प्रतिनिधी):
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदपूर केंद्र आपेगाव (ता.पैठण) येथे २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार व योगासने करुन दाखवली.यामध्ये योगासने,प्राणायाम, कपालभाती,अनुलोम विलोम,भ्रामरी,सूर्यनमस्कार यांचा समावेश होता.पद्मासन,ताडासन,वृक्षासन,वज्रासन,सेतुबंधासन,पद्मासन,हस्तपादासन,त्रिकोनासन,मकरासन,सुखासन भुजंगासन,शवासन यासारख्या आसनांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.’व्यायाम हीच शरीराची गुरुकिल्ली आहे’.’योग व प्राणायामाने मन व शरीर दोन्ही ताजेतवाने व प्रसन्न राहते’ असे शिक्षकांनी प्रात्यक्षिक करताना सांगितले.याप्रसंगी शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ,पालक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.
योगदिन यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरुण गोर्डे, पदवीधर शिक्षक उदय सुलाखे,सुनील जोशी,भागवत पांगरे,भक्तराज फुंदे शशिकांत ठोंबरे, श्रीमती वर्षा गर्जे यांनी परिश्रम घेतले.