कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूट मधील असंख्य विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.
गौतम एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांना सहजपणे नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्लेसमेंट सुविधा पुरविण्यात येते.त्या माध्यमातून विविध कंपन्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्यांना चांगल्या प्रकारचे पॅकेज देवून काळोखे आर एम सी, सिग्मा इंजिनियर्स सोल्युशन, बॉश, लक्ष्मी लिमिटेड ,रेम्बो ब्रेक्स, बजाज ऑटो यासारख्या देशातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
यामध्ये तृतीय वर्ष स्थापत्य विभागात दिनेश गोंदकर व सुबोध जाधव तसेच यंत्र अभियांत्रिकी मध्ये प्रेम शिंदे, दर्शन सोनवणे, जगरिया शेख, आनंद सांगळे, उद्धव शेवाळे, रोहन शिलेदार,ओम जाधव, तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी मधील साईप्रसाद जावळे, स्वप्नील सदाफळ, प्रज्वल रांधवन, महेश आदमाने, रोहन गुंजाळ या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे तसेच सर्व गव्हर्निग कौन्सिल सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. याकामी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राम कोकाटे यांचे सहकार्य लाभले.