संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १० अभियंत्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

0

 आपल्या प्रत्येक अभियंत्यासाठी ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे प्रयत्न
कोपरगांव: आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक अभियंत्याला नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवुन द्यायची आणि त्यांच्या आई वडीलांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचा, असा निर्धारच संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सर्व विभागांच्या मदतीने ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाने केलेला आहे. या अनुषंगाने  टी अँड  पी विभागाचे सातत्याने आपल्या अभियंत्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्याचे कार्य अखंड चालु असते. अलिकडेच टी अँड  पी विभागाने आपल्या १० अभियंत्यांना ७ कंपन्यांमध्ये त्यांच्या अंतिम निकाला अगोरच चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  मिळवुन दिल्या, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
         एंडुरन्स टेक्नॉलाजिज लिमिटेड या कंपनीने दर्शन  संदिप आव्हाड, रोहित डिगंबर ठुबे आणि अमोल भगवान गव्हाणे यांची निवड केली आहे.डूरोशॉक्स इंडिया प्रा. लि. कंपनीने सुरज किरण धात्रकची निवड केली. सिस्टिमॅटीक ग्रुप (ग्रिफॉन)ने अमित नानासाहेब गायकवाडची निवड केली आहे. मुळची फ्रान्सच्या असलेल्या बीईआयसी प्रा. लि. या कंपनीने तेजस अनिल निकुंभची निवड केली आहे. निलकमल इंडस्ट्रिजने सुरज सुखदेच शिंदेची  निवड केली. एनआरबी बिअरींग लि. ने सोमेश  मच्छिंद्र निवरे ची निवड केली आहे. वैभव सुभाष  कडलग व सुजीत बाळासाहेब चव्हाण यांची सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा. लि. कंपनीने निवड केली आहे.
          संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर व डीन टी अँड  पी डॉ. विशाल  तिडके यांचे अभिनंदन केले आहे.
चौैकटः
सर्व सामान्यांच्या मुला मुलींना दर्जेदार व आधुनिक तांत्रिक शिक्षण  मिळुन त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळाव्यात, काहींनी स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे, या हेतुने सुमारे ४२ वर्षांपूर्वी  एक दुरदृष्ठीचा विचार करून संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात इंजिनिअरींग  कॉलेज स्थापन करून तंत्रशिक्षणाची गंगोत्री आणली. आज कोपरगांव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातीलही ग्रामिण भागातील प्रत्येक खेड्यातील  किमान पाच ते दहा मुलं मुली इंजिनिअर होवुन चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  करीत आहेत. यामुळे ग्रामिण अर्थ कारणाला बळकटी मिळण्यास मदत झाली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालकांप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरून आपले विद्यार्थी यशाची  उंच भरारी कशी  घेतील, या दृष्ठीने  प्रयत्न करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. या सर्व बाबींमुळे स्व. कोल्हे यांचे स्वप्न सत्यात उतरून मोठ्या संख्यने अभियंते नामांकित कंपन्यांमध्ये रूजु होणे ही बाब खऱ्या अर्थाने स्व. कोल्हे यांना आदरांजली ठरत आहे.- अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here