विश्वचषक ..

0

गाजला विश्वचषक

क्रिकेट महा संग्राम

उत्साही द्विदिवाळी

महोत्सवाचा हंगाम

जुने  विक्रम मोडता

रचले नवीनआयाम

संकलन  माहितीची

होई बुध्दीचेव्यायाम

सगळे क्रिकेटमयीचं

विसरले बाकी काम

एकच विषय चर्चेला

रे क्रिकेट सुबह शाम

डोळे नीत  विस्पारले 

पापण्यांना न विश्राम

डोक्यात  सतत भुंगा

कमी पडला झेंडूबाम

जे खेळे जीव ओतून

त्यासर्वा सादरप्रणाम

हारजीत होत राहीलं

प्रयासा प्रशंसा इनाम

निमीत्त असे  खेळाचे

एकत्र येई जन तमाम

आरंभ नव्यादोस्तीचा

हा नसे रे  पूर्ण विराम 

– हेमंत मुसरीफ पुणे.

  ९७३०३०६९९६ 

 www.kavyakusum.com

2

वर्ड कप ..

तोंडाशी  येता येता

नीत हिरावला घास

विजयीमाळे ऐवजी 

गळ्यां बसला फास

उत्साहयंदा शिगेला

स्पर्शे आनंदे नभास

गवसणी घातली हो

अंति विश्व चषकास

विजयस्वताचं हजर

बदले सगळे कयास

सोपे नव्हते जिंकणे

अथक केला प्रयास

मैदानात रे खचखच

भरला संपूर्णविश्वास

उत्कंठावृध्दी खेळात

रोखून धरलेला श्वास

उंचावलेल्या  अपेक्षा

परिपूर्ण केल्या खास

बाजी लावे बाजीगर

संतृप्त करे रसिकांस

दीडदशकाची प्रतिक्षा

सरलाक्षणात वनवास

भारतीय किंमतहिंमत

जाण आली रे विश्वास 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here