पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. विश्वनाथ शिंदे यांची निवड

0

सातारा अनिल वीर : मुक्त सृजन संस्था व मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने दुबई येथे दि.५ डिसेंबर ते दि.१० डिसेंबर या दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे.त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे संचालक व शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील मराठी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ . विश्वनाथ शिंदे यांची संमेलनाध्यक्ष  म्हणून निवड करण्यात आलेली आहे.असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी जाहीर केले आहे.

 विश्वनाथ शिंदे हे लोकसाहित्याचे संशोधक व अभ्यासक म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांना दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाकडून इमीनन्स प्रोफेसर म्हणून दिली जाणारी विशेष शिष्यवृत्ती  मिळालेली होती. उत्तम शिक्षक,समीक्षक, संशोधक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी प्रतिमा घडवली आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना आदर्श शिक्षकांचाही बहुमान मिळाला होता.लोकसाहित्यमीमांसा भाग एक व दोन, लोकधाटी अवलोकन व विचार, पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य, शाहिरी वाङ्मयाच्या धारा, लावणीचे लावण्य, मोनोग्राफ ऑफ मराठी पोवाडा, पोवाडा महाराष्ट्राचा, मराठी नाटक आणि रंगभूमी, मराठी शाहिरी पोवाडा, मराठी ऐकीव, शोधयात्रा लोकरंगभूमीची, लोकसाहित्य: संशोधन आणि समीक्षा, सावळजकरांचा तमाशा : इतिहास आणि वाड्मय, मराठी साहित्य आकलन आणि आस्वाद, महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्य धर्म, सत्यशोधक साहित्याचे प्रणेते : महात्मा जोतीराव फुले हे  ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. 

     लोकदेव खंडोबा आणि वाघ्या मुरळीचे जागरण, महाराष्ट्रातील भटक्या जमातीच्या बोलीचा अभ्यास, मराठी तमाशा आणि वगनाट्य, मराठी दंतकथा हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाली आहे. २५ विद्यार्थ्यांना एम. फिल. ची पदवी प्राप्त झाली आहे.८० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रकाशित आहेत.अनेक विद्यापीठाचे ते अभ्यास मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठता म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

        सदरच्या बैठकीस बैठकीला डॉ.संतोष देशमुख,प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे,प्रिया धारूरकर, डॉ. निलेश देगावकर, हनुमंत सोनवणे,डॉ.संभाजी पाटील, डॉ. किसन माने आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here