देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : देशातील प्रथम नागरिक यांना एकच मताचा अधिकार तोच अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे.मतदानाचा हक्क न बजवता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नावे ठेवण्याचा अधिकार नाही. आपले एक मतदान लोकशाहीला बळकट करणारे असल्याने या पुढील निवडणूकीत सर्वांधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे प्रांतधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेने लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रांतधिकारी तथा प्रशासकीय नगराध्यक्ष किरण सावंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी नानासाहेब टिक्कल यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे, वसंतराव कदम, संदिप कदम, संभाजी वाळके,करनिरीक्षक तुषार सुपेकर,संगणक अभियंता भूषण नवाल, कनिष्ठ अभियंता दिनकर पवार,लेखापाल कपिल भावसार, उदय इंगळे,वसुली लिपिक सारंगधर टिक्कल,विजय साठे,गोरख भांगरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांतधिकारी तथा प्रशासकीय नगराध्यक्ष सावंत पाटील म्हणाले की, कोणतीही शासकीय योजना निघाली की नागरिकांची सेतू व महसुल कार्यालयात गर्दीचा उच्चांक होतो.राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्यासाठी नागरिकांच्या रांगा का लागत नाही.शासनाचा लाभार्थी ठरण्याचा जसा अधिकार आठवतो तसाच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आठवणित ठेवले पाहिजे.लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मतदान मोलाचे ठरत असते असे सावंत पाटील यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत मतदान वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण सावंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मतदान वाढविण्यासाठी बचत गटांनी केलेल्या प्रयत्नमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मीआई महिला बचत गट,द्वितीय क्रमांक राजर्षी शाहु महाराज पुरुष बचत गट,तृतीय क्रमांक सोमेश्वर महिला बचत गट.सेल्फी विथ वोट स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका रावसाहेब लहारे,द्वितीय क्रमांक स्वाती सचिन साळवे,तृतीय क्रमांक सादिक गुलाबमोद्दिन शेख,चतुर्थ क्रमांक रामनाथ रखमाजी वरखडे. मतदान वाढविण्यासाठी सहभागी मंडळामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान,द्वितीय क्रमांक आझाद मिञ मंडळ,तृतीय क्रमांक सोमेश्वर देवस्थान.केंद्रियस्थरीय मतदान अधिकारी (बीएलओ) प्रथम क्रमांक मोहम्मदअसिफ इक्बालमोहम्मद आरिफ,द्वितीय क्रमांक राजेंद्र शंकर हारगुडे,तृतीय क्रमांक अमोल सुभाष कांबळे.वैयक्तिक सेल्फी वोट स्पर्धेत सहभागी झालेल्या नागरिकांना प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले.
यावेळी संतोष कदम,दत्ता गागरे,अन्वर सय्यद,वसिम शेख,महेंद्र दौंड,अरुण पटारे,अनिल जाधव,बाबासाहेब खांदे,अमोल वाळुंज,वैभव कदम,किशोर ढुस,अनिल मुसमाडे,कुणाल तनपुरे,प्रतिक्षा टिक्कल,शर्मिला रणधीर,सारीका लहारे,कविता तनपुरे,संतोष हारदे,प्रसाद टिक्कल,विकास गडाख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन सुनिल गोसावी,तर आभार प्रदर्शन अभिषेक सुतावणे यांनी केले.