जनतेनी घेतला मोठया प्रमाणात लाभ.
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे उरण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ आणि आरोग्य केंद्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन उरण रानसई येथील प्राथमिक शाळेच्या समाज मंदिर हॉल येथे करण्यात आले होते.
आरोग्य तपासणी ही एक सर्व समावेशक वैद्यकीय तपासणी आहे जी प्रत्येकाच्या एकूण आरोग्याचे मूल्यांकन करतो,संभाव्य समस्या शोधतो आणि आरोग्यासाठी वैयक्तिक शिफारशी देतो.आणि म्हणूनच जीवनातील कठीण प्रसंगात आजारी रुग्णांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्या करिता अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आहे अश्यातच आपल्याला अनेक शारीरिक त्रास असणा-या गरीब गरजूवंत रुग्णांना त्यातच खास करून आदिवासी बांधवांनां आपल्या आरोग्य तपासण्या करण्याकरिता आणि उपचारा करिता शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचार घेणं अवघड आणि जिकरीचे झालं आहे.आणि अश्याचतच गरीब गरजूवंतांच्यां मदती करिता सदैव मदतीचा हात पुढे करणारं रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे उरण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधिरभाई घरत यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या सहकार्यातून उरण शहरांत मोठं नावं असणारं उरण वैद्यकीय अधिकारी वर्ग आणि गिरी रुग्णालय आणि गिरी रुग्णालयाचे डॉ.व्यंकटेश गिरी सर, डॉ.अमोल गिरी, डॉ.नितीन गांडीगुडे यांच्या संयोजनातून आणि माजी विद्यार्थी संघ आणि आरोग्य केंद्र समिती यांच्या आयोजनातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.रानसई प्राथमिक शाळा समाजमंदिर हॉल येथे आयोजित ह्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांत शरीराच्या अनेक तपासण्या करण्याकरिता आणि उपचार घेण्याकरिता रानसई आदिवासी वाड्यांवरील अनेक आदिवासी बांधव,महिला भगिनीं आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी विद्यार्थी संघ आणि आरोग्य केंद्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुधिरभाई घरत ,केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर साहेब,डॉ.व्यंकटेश गिरी ( चाईल्ड स्पेशलिस्ट,डॉ.अमोल गिरी ( आय स्पेशलिस्ट),डॉ.नितीन गांडीगुडे ( जनरल फिजिशियन ), डॉ.अमोल गिरी( जनरल फिजिशियन ),पंकज भोये ( चेअरमन हेल्थ सेंटर समिती ), डॉ. पी.जी.पवार ( प्राचार्य वीर वाजेकर कॉलेज फुंडे ), रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाताई पारधी, ग्रा.पं.सदस्या रेखाताई चौधरी रानसई प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कडू मॅडम, रानसई विभागातील युवा सामाजिक कार्यकर्ते श्याम लेंडे,अनिल घरत( उरण तालुका सचिव – आगरी, कोळी, कराडी, संघर्ष, सामाजिक, संस्था ) आदी मान्यवर आणि उरण वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.वीर वाजेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी.जी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन,प्रस्तावना चंद्रशेखर म्हात्रे यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीत केलं तर मान्यवरांचे स्वागत उमेश म्हात्रे,राजेश ठाकूर, विरेंद्र पाटील यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला,विज्ञान,आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे उरणच्या माजी विद्यार्थी संघ आणि आरोग्य केंद्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनां चहा – नास्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. ह्या आरोग्य तपासणी शिबीरा करिता उरण – रानसई येथील बंगल्याचीवाडी, खोंड्याचीवाडी,सागाचीवाडी, मार्गाचीवाडी आणि आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधव आणि महिला भगिनीं व रानसई प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा प्रतिसाद सुद्धा अभूतपूर्व असाच होता.