सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास,”अत्त दीप भव !” हे बोधवाक्य मिळाल्याने सर्व स्तरांत आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठाचे बोधवाक्य निर्धारित करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी,”अत्त दीप भव!” हे बोधवाक्य सुचवले होते.ते विद्यापीठाच्या नियामक मंडळाने स्वीकारले असून त्यास मान्यताही देण्यात आली आहे.याबद्धल डॉ. वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.