बुलडाणा,(प्रतिनिधी) : – देऊळगाव राजा तालुक्याला २०२० पासून बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नवीन विहिरी मिळणे बंद आहे ती योजना त्वरित चालू करावी अशी मागणी इंजिनीयर शरद खरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने काही दिवसापूर्वी सर्वेक्षण केले होते त्या सर्व्हे मध्ये संपूर्ण देऊळगाव राजा तालुका क्रिटिकल झोन मध्ये दाखवला होता आता
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती जमाती साठी राबविण्यात येत असल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील लोकांना सदर योजनेचा फायदा सन २०२०-२१ पासून मिळणे बंद झाले आहे आता शासनाने क्रिटिकल झोन ही अट नियमबाह्य करून मागासवर्गीयांना दिलासा द्यावा अशी मागणी आर.पी. आय आठवले गटाचे उपजिल्हाप्रमुख शरद खरात यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे त्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांचे मार्फत मागणी केली आहे तसेच मुख्यकार्यकारी जिप बुलडाणा व जिल्हा कृषी अधिकारी बुलडाणा यांना ही निवेदन दिले.