दीक्षाभूमीला विद्रुप करण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र – डॉ. नितीन राऊत  

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे शोषितांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ

    नागपूर, (प्रवीण बागड़े) :    शोषितांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आले असून नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमी संपूर्ण जगात नावलौकिक आहे. परंतु येथील सौंदर्यात भर घालण्याऐवजी दीक्षाभूमीला विद्रुप करण्याचा षडयंत्र राज्यातील शासनकर्त्यांनी रचल्याचा आरोप करून भूमिगत पार्किंग मुळे दीक्षाभूमीच्या दर्शनीभागाला विद्रूप स्वरूप प्राप्त होईल, असे स्पष्ट मत राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज दीक्षाभूमीची पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. यावेळी आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेस नेते प्रफुल गुडधे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

1 जुलै रोजी नागपूरातील दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज डॉ. राऊत यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. घटनेदरम्यान डॉ. राऊत मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात उपस्थित होते. पवित्र दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंग विरोधात आक्रमक भूमिका घेत समाजबांधवांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील अंडरग्राउंड पार्किंगच्या मुद्दा डॉ. राऊत यांनी विधानसभेत लावून धरला होता. दरम्यान, याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तात्काळ येऊन दिक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा केली होती.

यावेळी बोलतांना दीक्षाभूमीचा  होत असलेला पुनर्विकास याचा शांतपणे विचार स्मारक समिती आणि समाज बांधवांनी करायला हवा. असा महत्वाचा सल्ला देखील डॉ.राऊत यांनी दिला.
दीक्षाभूमीच्या रक्षणासाठी व योग्य देखभालीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत. प्रसंगी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाशनाथ पाटणकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर को- आऑप. बॅन्केचे अध्यक्ष अनिल नगराळे, भीम पॅन्थरचे मनोज बंसोड, रिपब्लिकन मूव्हमेंटचे दिनेश अंडरसहारे, रिप नेते अशोक कोल्हटकर, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी उपस्थित होते.

येथील भूमिगत पार्किंगला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याकडून सूचना घ्यायला हव्या होत्या. त्यानंतर बांधकाम सुरु करायला पाहिजे अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी स्मारक समिती आणि राज्य सरकार वर टिका केली.

प्रसंगी नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बंडोपंत टेम्भूर्णे, विनोद राऊत, सुरेश पाटील, निलेश खोब्रागडे, गौतम अंबादे, कल्पना द्रोणकर, विजयालक्ष्मी हजारे, सचिन वासनिक, चेतन तरारे, इंद्रपाल वाघमारे जयभीम मित्र मंडळचे रजत द्रोणकर, सागर उपरे इत्यादी उपस्थित होते.

खोदकाम मुळे दुर्घटनेची शक्यता

धम्मचक्र प्रवर्तन दिनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिनी आणि बुद्ध पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक दीक्षाभूमीवर येतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला शंभर दिवस शिल्लक आहेत. या परिसरात 10 लाखांच्यावर लोक येत असतात. अश्यातच याठिकाणी केलेले खोदकाम आणि वरपर्यंत आलेले सळयां मुळे मोठी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. तात्काळ उपाययोजना करने गरजेचे असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.

समाज कल्याणचाच निधी का?

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना राबविल्या जातात. परंतु स्मारकांच्या विकासांकरिता समाज कल्याणचाच निधी का?असा प्रश्न देखील डॉ. राऊत यांनी उपस्थित केला. जनरल मधून देखील निधीची तरतूद केली जाऊ शकते. असे डॉ. राऊत म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here