उरण दि. 17(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र सिद्धार्थ अतूल भगत हे ग्रीनवीच युनिव्हर्सिटी लंडन येथे उच्च शिक्षणासाठी दाखल झाले आहेत. लहानपणापासून कुशाग्र व हुशार बुद्धीमत्ता असलेले सिद्धार्थ भगत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण केल्यानंतर MSC ईन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या विषयाचे शिक्षण सिद्धार्थ घेत आहे. सिद्धार्थ हे शिंदे गटाचे शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख अतूल भगत यांचे सुपुत्र आहेत. उच्च शिक्षणासाठी भेंडखळ ग्रामस्थ, भगत कूटूंब, नातेवाईक, मित्रपरिवारांनी सिद्धार्थ भगत याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत