सातारा : येथील रिपाइं (ए) च्या जिल्हा मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या अभिष्टचिंतनपर विविध उपक्रमाने आनंद सोहळा संपन्न झाला.
मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा. म्हणून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्याचा बक्षीस वितरण सोहळा कार्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट पत्रकार आनंदराव थोरात (कराड) व अनिल वीर यांच्यासह शाहिर प्रकाश फरांदे,संजय नितनवरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व पक्षाचे राज्य, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.दिवसभर आनंद सोहळा चालु होता. अनेकांनी भेटून ओव्हाळ यांना भेटुन केक कापण्याबरोबरच सत्कार करीत होते.