नगर – सुदृढ, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा वाचनालयाचा द्विशतकी वारसा हा अभिमानास्पद व लोकाभिमुख आहे. अ.नगर जिल्हा वाचनालयाची ही वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आपण सर्वतोपरि प्रयत्न करु, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा वाचनालय सावेडी शाखेच्या मातोश्री यमुनाबाई त्रिंबक देशमुख ग्रंथालयास सदिच्छा भेट प्रसंगी आ.तांबे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष दिलीप पांढरे, प्रकल्पाच्या समन्वयक व संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, संचालिका शिल्पा रसाळ, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल, इंजिनिअर रविंद्र थिगळे, मसपाचे किशोर मरकड, वाचनालयाच्या सौ.सारिका देव, पुनम गायकवाड उपस्थित होते. आ.तांबे यांनी यावेळी सावेडी शाखेच्या आधुनिक स्पर्धा परिक्षा केंद्र व सुविधांसाठी आपण मदतीस कटिबद्ध असल्याचे सांगितले.
प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी यावेळी बोलतांना ‘युवा पिढीचे सक्षम नेतृत्व व आधुनिकीकरणाची कास असलेले आ.सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून वाचक नगरकरांना मोठी मदत मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा वाचनालयाच्यावतीने आ.सत्यजित तांबे याचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक शिल्पा रसाळ यांनी केले तर आभार अमोल इथापे यांनी मानले. यावेळी कर्मचारी कु.साक्षी पद्मा, दिपाली कल्याणम् उपस्थित होते.