सातारा/अनिल वीर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, तालुका महाबळेश्वर शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत वरद विजय डूबे याने 268 गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावला तर शुभंकर विष्णू ढेबे या विद्यार्थ्याने 264 गुण मिळवत जिल्हा यादीत तेविसवा क्रमांक पटकावला आहे.त्याच
बरोबर मीत विजय जाधव व अंश शंकर चाटसे हे शाळेतील दोन विद्यार्थीही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम गुण मिळवत पात्र झाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे उपशिक्षक महेश पवार यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सुनिल पार्टे,गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,मधूसागरचे उपाध्यक्ष संपतभाऊ जाधव, संतोषआप्पा जाधव,सरपंच दिपाली पवार, नदीमभाई शारवान,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिबा चव्हाण, कोंडीबा जाधव.केंद्र संचालक अरुण कदम सर, संतोष ढेबे सर ,मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ, चिखली अभिनंदन केले आहे.