सुदाम गाडेकर, जालना प्रतिनिधी :
पीक विमा कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नव्हता . त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला होता .पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याची दखल शेतकरी संघटनेचे विधी तज्ञ ,प्रदेश अध्यक्ष अजित काळे यांनी स्वतः लक्ष घालून सरकार व विमा कंपन्या न्यायालयीन लढाईचा इशारा देताच पीक विमा कंपन्यां वठणीवर येऊन शेतकऱ्यांना ८८ कोटी रुपये पीक विमा मजूर करण्यात आला .
अजित काळे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असून लवकरच शेतकऱ्यांनच्या खात्यावर विम्याचे पैसे वर्गावर होण्याची काम सुरुवात होणार आहे शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी अजित काळे यांचा सत्कार करून आभार मानले
यावेळी प्रदेश अध्यक्ष अजित काळे साहेब यांनी तालुका कार्यकारणीची घोषणा केली ती लवकरच प्रसिद्धी साठी उपलब्ध होईल.पद हे शोभेचे नसून त्याला कामाची जोड द्यावी लागेल अशे त्यांनी सांगितले
त्याप्रसंगी माननीय जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ आप्पा तुवर यांनी अशी सांगितले की शेतकरी संघटनेची पाठपुराव्यामुळे व अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हा पिक विमा मिळाला आहे तरी शेतकरी एकजुटीचा विजय असो अशी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले .
या कार्यक्रमासाठी डॉक्टर रोहित कुलकर्णी, बाबासाहेब नागवडे, जिल्हा संघटक भास्करराव तूवर, जिल्हा शेतकरी संघटना मार्गदर्शक कैलास पवार, दत्तू पाटील निकम, गणेश कंक, नेवासा शिवसेना संस्थापक नेते नेवासा शहर अंबादास लष्करे , तसेच जिल्हाध्यक्ष विजय अंकल गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे यांनी काळे साहेबांचा सत्कार केला. तसेच सोमनाथ औटी. घुले प्रभाकर,शेरकर वसंतराव, विश्वास मते, भाऊसाहेब कावळे वकील, प्रदीप नवले, अशोक नागवडे, विजय मते, कर्डिले पाटील, भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे व इत्यादी शेतकरी उपस्थित होते.