अज्ञात चौंघावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शेतकरी विकास मलंगणेर यांनी जामखेड येथे कांदा विकुन आलेल्या कांद्याच्या पट्टीचे पैसे आपल्या नान्नज गावी घेऊन जात असतानाच जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याजवळ पाठीमागून दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी या शेतकर्याची मोटारसायकल अडवुन, दगडाने मारहाण करत मोबाईलसह त्यांच्या जवळील १ लाख ६४ हजार रुपयांना लुटले.
ही घटना सोमवार दि १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याने नान्नज सह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी विकास दत्तु मलंगणेर वय ४५ वर्षे रा. नान्नज यांनी पंधरा दिवसापुर्वी शेतातील काढलेला कांदा जामखेड येथील एका ट्रेडर्सच्या दुकानात घातला होता. यानंतर शेतकरी विकास मलंगणेर हे काल सोमवार दि १५ रोजी या कांद्याचे पैसै घेण्यासाठी जामखेड येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे जोडीदार अशोक महादेव मोहळकर हे देखील होते. मलंगणेर यांनी कांद्याच्या पट्टीचे १ लाख ६० हजार रुपये घेऊन शर्टच्या आतील भागात ठेऊन ते जोडीदारा सोबत मागे मोटारसायकलवर बसुन आपल्या नान्नज गावी निघाले होते.
याच दरम्यान पाळत ठेऊन असलेल्या चौघा अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या दोन मोटारसायकलवरून या शेतकर्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी फीर्यादी यांची मोटारसायकल जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याच्यावर आली असता यातील चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल अडवली व फीर्यादीस व जोडीदारास दगडाने मारहाण करत फीर्यादीच्या शर्टाच्या आत मध्ये ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये व ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे एकुण १ लाख ६४०० हजार रुपयांचा ऐवज हीसकावून घेऊन घटनास्थाळाहुन मोटारसायकलवरून चोरटे पळुन गेले. या घटनेत फीर्यादी व सोबत असलेले अशोक मोहळकर हे किरकोळ जखमी झाले.
या प्रकरणी तातडीने फिर्यादी शेतकरी विकास मलंगणेर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेत घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. यानंतर फिर्यादी विकास मलंगणेर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गौतम तायडे हे करत आहेत.
भरदिवसा सायंकाळी सहा वाजता शेतकर्यास लुटण्याची घटना घडली असल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या पुर्वी देखील काही वर्षापुर्वी देखील भरदिवसा जामखेड कुसडगाव रोडवरील काझेवाडी तलावाजवळ एका सोन्याच्या व्यापाऱ्यास लुटले होते. जामखेड तालुक्यात भरदिवसा चोरी व लुटमारीच्या घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नान्नज सह जामखेड तालुक्यातील नागरीक करत आहेत तालुक्यात शेतकऱ्यां मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱी जामखेड ला येणे साठी घाबरत आहे अशी भिती निर्माण झाली आहे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे