साताऱ्यात वाजत गाजत वृद्ध कलाकारकांचे मानधन फॉर्म भरणार !

0

सातारा/अनिल वीर : वृध्द कलाकार मानधन फॉर्म सामुहिकरित्या जमा करण्यासाठी  गुरुवार दि.१८ रोजी दुपारी १२ वा.जिल्हयातील वृध्दकलाकार पेन्शन फॉर्म सातारा जिल्हा परिषद येथील समाज कल्याण विभागात जमा करत आहोत.ते जमा करत असताना पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अभिवादन करुन मिरवणूकीने जिल्हा परिषद ऑफिसमध्ये वाजत गाजत येणार आहोत.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस बँड बेंजो चालक व कलावंत विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.

             

सन २०२४ मधील वृध्द कलाकार मानधनाचे फॉर्ममध्ये बैन्ड बॅन्जो विभागातील कलाकार वंचित राहीलेला आहे. (गतवर्षीच्या निवडलेल्या १०० फॉर्ममध्ये शासन आदेशानुसार सांघिक प्रकारातील बँन्ड कलाकार एकही दिसत नाही.) तरी आता आम्ही संघटनेच्या व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या माध्यमातून जिल्हयातील बैन्ड-बेंजो प्रकारातील कलाकार मानधन फॉर्म शासन निर्णयानुसार परिपूर्ण स्थितीत जमा करत आहोत. असे एकूण फॉर्म स्विकारुन कार्यवाही करताना शासन निर्णय क्र.वृक्रमा ४३२१ (१५) /प्र.क्र. १४५/सां.का. ४ पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग मंत्रालय मुंबई दि.१६ मार्च २०२४ नुसार सातारा जिल्हयातील वृध्द कलाकारांचे फॉर्म मंजूर होवून त्या कलाकारांना न्याय मिळावा.अशा प्रकारचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) व नितीन उबाळे (सह-आयुक्त,समाजकल्याण विभाग) यांच्याकडे देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here