…… अन्यथा,रिपाइं शुक्रवार दि.१९ रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार !
सातारा/अनिल वीर : मराठा-मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना कडक शासन झाले पाहिजे.मस्जिदिमध्ये घुसून तोडफोड करणाऱ्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत.अन्यथा, शुक्रवार दि.१९ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आत्मक्लेश करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले एकमेव असणारे प्रथम गुरु राजमाता जिजाऊ यांच्या माध्यमातून जी शिकवण घेतली होती. त्यामुळे दुश्मन जरी असेल तरी त्यास माना सन्मानाची किंमत देणे. त्याचपद्धतीने त्यांनी दुश्मनांच्या धर्मांचा व मृत्यू पावलेला मृतदेहाला सुद्धा मानसन्माची वागणूक देण्याची शिकवण राजमाता जिजाऊ यांनी दिली होती. त्याचपद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी व त्याच पद्धतीने अनेक गडावरती मुस्लिम समाजाची कबर व पीर आहेत. त्याचे संगोपन हे त्या त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहे. त्याच धर्तीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धर्माबद्दल आदर व प्रत्येक धर्माला प्रसार व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु आज कालच्या काळामध्ये राजकारणांची पोळी भाजून घेण्याकरता काही लोकांनी मराठा व मुस्लिमांमध्ये भेद करीत आहेत.साताऱ्यातील खानाची कबर उध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने साताऱ्यामध्ये चंदन वंदन डोंगर पायथ्याशी असणारे अतिक्रमण, वर्धनगड येथील असणारे मुस्लिमांचे आदर्श,पश्चिम महाराष्ट्रातील जागृतीतील विशाळगड इत्यादी ठिकाणी मुसलमान समाजासह इतर समाजाचे लोक आदराने ये-जा करीत असतात. परंतु, काही लोकांनी दलित,मराठा व बहुजन समाजातील तरुणांची माती भडकवून हा दंगल सदृश्य असा प्रकार सुरू केलेला आहे.
या लोकांना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाती-जातीमध्ये दंगली पेटवायच्या आहेत.त्यामुळे अशा दोन समाजामध्ये दुही पेटवणाऱ्या लोकांवरती कडक शासन झाले पाहिजे.काहीजणांनी एखादी खाजगी प्रॉपर्टी असणाऱ्या मस्जिद व दर्ग्यामध्ये प्रवेश करून ते उध्वस्त केलेले आहेत. त्यातील मौल्यवान वस्तूही पळून नेलेल्या आहेत.त्यामुळे अशा लोकांना संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दरोड्यासारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत.अन्यथा, शुक्रवार दि.१९ रोजी छ.शिवाजी महाराज शिवतीर्थावर पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११।। वाजता निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.सदरच्या निवेदनावर दादासाहेब ओव्हाळ यांच्यासह शहीद कुरेशी,राजू ओव्हाळ,शाबीर डोंगरे,सलीम शेख,सलीम बागवान,राजेंद्र होटकर,याकूब दाऊद वारूनकर, मदन खंकाळ,हर्षालान कुरेशी आदींच्या स्वाक्षरी आहेत.