विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पैठण विधानसभा मतदारसंघाचा दौरा.

0

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक घेतला आढावा.

पैठण ,(प्रतिनिधी): शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघाचा शिवसंकल्प मोहिमेनिमीत्त दौरा केला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा परिषद विभागनिहाय संघटनात्मक बाबींवर त्यांनी आढावा घेतला. 

  पैठण शहर, आपेगांव, पिंपळवाडी, ढोरकिन, बिडकिन व चितेगांव या जिल्हा परिषद विभागांतील पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधला.तसेच शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केल्या. तातडीने यावर कार्यवाही करून त्या मार्गी लावण्याचा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते दानवे यांनी केल्या.

   

पैठण विधानसभा मतदारसंघातील गद्दाराला पराभूत करायचे असेल तर जलद गतीने शिवसेना सदस्य नोंदणी वाढविणे आवश्यक आहे.सामान्य जनतेचे काम करणे म्हणजे शिवसेना असून मतदारसंघातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत पोहचा अशी सूचना करून शिवसैनिकांना मतदारापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हाती दिला.

   निवडणूक आयोगाकडून युद्ध पातळीवर मतदार नोंदणी सुरू असून आपल्या आख्यातरित येणाऱ्या कार्यक्षेत्रांतर्गत सर्व नव मतदारांची नोंदणी करून घ्यावी. सामाजिक माध्यमांत राजकीय परिस्थिती बदलण्याची ताकद असून सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सक्रिय पद्धतीने या माध्यमांचा वापर केला पाहिजे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व शिवसेना नेत्यांनी मांडलेली भूमिका सर्वांपर्यंत पोहोचवा अशी सूचना दानवे यांनी केली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख अंकूश रंधे, दत्ता गोर्डे, संतोष जेजूरकर, तालुकाप्रमुख मनोज पेरे, आनंद भालेकर,विधानसभा संघटक बद्रीनारायण भुमरे,तालुका संघटक सोमनाथ जाधव, अक्षय शिसोदे, पी.आर थोटे, सुरेश दुबाले,समीर पटेल, शहरसंघटक सचिन तायडे, दिपक पवार, महिला आघाडी जिल्हा संघटिका राखीताई परदेशी व तसलिम शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here