सातारा/अनिल वीर : संततधार पाऊस चालु असल्याने राहुडे,ता. पाटण येथील जि.प.प्राथमिक शाळेचा रस्ता खचला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीच पाणी झाले आहे.पाण्याचा प्रवाहसुद्धा मोठ्या प्रामाणावर चालु आहे.त्यामुळे अध्ययनार्थी व शिक्षकांना येणे-जाणे मार्ग बंद झाला आहे.तरीही जीव मुठीत घेऊन दळणवळण पार करावे लागत आहे.आशा परिस्थितीत शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने उपसरपंच प्रशांत चव्हाण व अजय चव्हाण यांना माहीती दिली.त्यांनी जेसेपी बोलावुन शाळा परिसरातील पाणी बंद केले.
जिल्हा प्राथमिक शाळा राहुडे येथे शिक्षण सप्ताह नियोजन चालू आहे.अध्यापन साहित्य दिवस, क्रिडा सास्कृतिक दिवस यासह विविध उपक्रम चालु असतात.याकामी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल रोकडे,उपाध्यक्ष विजय चव्हाण, सदस्य अजय चव्हाण आदींनी भेट देवुन साह्य करीत असतात. शाळेसाठी तातडीने ग्रामपंचायतनेही मदत केली आहे. शिक्षिका सौ.शोभा बारटक्के, सौ खतिजा डंगरे,सौ.मनिषा मस्करे आदींनी स्वागत केले.यावेळी उपसरंच प्रशांत चव्हाण, ग्रामसेवक राजेंद्र कर्णे,वैभव चव्हाण,धनाजी चव्हाण, धनराज चव्हाण, शुभम चव्हाण,मुरलीधर माने,बाळासाहेब माने,संतोष माने, समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.