नाडे-नवा रस्ता येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक कामाचे भूमिपूजन संपन्न

0

सातारा/अनिल वीर : पाटण तालुक्यातील नाडे-नवा रस्ता येथे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या संकल्पनेतून रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या कामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. 

             यावेळी पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार, खजिनदार माणिकशहा पवार, सदस्य नथूराम कुंभार.सचिव, सुमोद साळुंखे, विलास गोडांबे, मनोज मोहिते, जगदिशसिंह पाटणकर, शैलेंद्र शेलार,गणेश भिसे, बशीर खोंदू, श्रीमती मुक्ताबाई माळी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भूमिपूजन कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाईनी, तसेच पुतळा समितीचे अध्यक्ष व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराजदादा देसाई यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्मारकाचे काम पूर्णत्वास नेले जाईल, असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here