ज्ञानेश्वर शिंदे पोलीस उपनिरीक्षक व अनिल शिंदे हे सी. ए.परिक्षा उत्तीर्ण झाले बद्दल सन्मान…
कोपरगाव : प्रशासकीय सेवेसह जवळपास सर्वच क्षेत्रात विश्वासार्हता कमी होत चालली असून जनतेचा विश्वास संपादन करुन सभ्य लोकांशी माणुसकी जपत रहा.तरच भावी पिढीला आदर्श ठराल. असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी एका कार्यक्रमात केले.
कोपरगांव तालुक्यातील तिळवणी गावातील सद्गुरू संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (ग्रंथालय) वतीने ज्ञानेश्वर शिंदे पोलीस उपनिरीक्षक व अनिल शिंदे हे सी. ए.परिक्षा उत्तीर्ण झाले बद्दल सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके हे उपस्थित होते. तर कार्यक्रमास सद्गुरू संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (ग्रंथालय) चे संस्थापक विष्णु वाघ,शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अप्पासाहेब चक्के,को.न.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे ग्रंथपाल महेश थोरात,ग्रंथपाल निलेश वाघ, तुकाराम शिंदे,अनुलोमचे भागिनाथ गायकवाड,अनिल शेळके यांचे सह नागरिक, जि. प. प्राथमिक शाळा तिळवणीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुणे यांचे शुभहस्ते संत गाडगेबाबा प्रतिमा पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. वाचनालया ईमारतीस विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती प्रा. ना. स. फरांदे सर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानंतर ज्ञानेश्वर शिंदे पोलीस उपनिरीक्षक व अनिल शिंदे हे सी. ए.परिक्षा उत्तीर्ण झाले बद्दल शाॅल,सन्मानचिन्ह,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले. या प्रसंगी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी शाळेला सूर्यतेज संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रोप देवून विद्यार्थांना यशस्वी होण्यासाठी रोपांचे संगोपन करुन “वाचाल तर वाचाल” आणि “शिकाल तर टिकाल” हा सुविचार अंगिकार करण्याचे सांगितले तसेच दररोज आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वीतेसाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.
सत्कारमुर्ती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिदे आणि सी. ए. अनिल शिंदे यांनी ग्रंथपाल विषयी कृतज्ञता व्यक्त करुन या क्षेत्रातील गावातील एवढ्या उच्च पदावर पहिले असल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी निलेश वाघ, अशोक राहणे, बंडू राठोड,रावसाहेब लहरे, विवेक तळपे अनिल शेळके यांचे सह संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (ग्रंथालय)चे सदस्य आणि तिळवणी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.