देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मोटारसायकलची चोरी करणाऱ्या चौथ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.या टोळीतील संगमनेर येथिल तरुणाकडून 6 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असुन या मोटारसायकल चोरास राहुरी न्यालयाने सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनवली आहे.
याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील राहुरी शहराजवळील पिंपळाचा मळा यांच्या घरा समोर लावलेली पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने एक वर्षापुर्वी चोरुन नेली होती.राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर 965/ 2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.एक वर्षापुर्वी चोरी केलेल्या इसमाची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना खबऱ्या मार्फत चोरी करणारा संगमनेर येथिल रेहान शकील शहा हा राहुरी शहरात आला असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी गुन्हे शाखेच्या पथकास रेहान शकील शहा यास ताब्यात घेण्यास सांगितले.त्यास पथकाने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोटरसायकल चोरीची गुन्ह्याची कबुली दिली.
राहुरी न्यायालयात रेहान शकील शहा यास हजर केले असता.सहाय्यक सरकारी अँड.रविंद्र गागरे यांनी बाजू मांडली न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.पोलिस कोठडीत अधिक तपास केला असता अन्य साथीदाराच्या मदतीने चोरलेल्या एकूण 6 लाख 50 हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकल काढून दिल्या.त्याच्या अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशिराम गीते,पोलीस हे.कॉ. बाबासाहेब शेळके,विकास वैराळ,विकास साळवे, संदीप ठाणगे, हे.कॉ. सुरज गायकवाड,पो.ना. प्रवीण बागुल,पो.कॉ. प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख,अंकुश भोसले,सतीश कुऱ्हाडे,अमोल भांड यांनी केली.