कोपरगाव : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांनी सत्ता असताना दीड रुपयाहि दिला नाही. महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी दानत लागते अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली . ते कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आयोजित जन सन्मान यात्रेच्या जाहीर सभेमध्ये बोलत होते. ते कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आयोजित जन सन्मान यात्रेच्या जाहीर सभेमध्ये बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शक्तीकडेच प्रतीक म्हणून बघितलं जातं माया ममता प्रेम वात्साल्य करण्याची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली महादुर्गच्या रूपात देखील स्त्री शक्तीचा दर्शन घडतं आणि राष्ट्रनिर्मिती मध्ये स्त्रियांचा मोलाचे योगदान आहे.महिलांचे केवळ आर्थिक सक्षमीकरण करून चालणार नाही तर त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे आवशक आहे . महिलांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबाच्या जोरावर मला मिळाली त्यात मी महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी युवतींच्या साठी शेतकरी वर्गासाठी अनेक नवीन नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला
योजना आणण्यामागचं कारण असं होतं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत महिलांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक होत नाही तोपर्यंत महिला विकासाचा उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समोर जात असताना महायुतीच्या माध्यमातून त्या घटक पक्षांच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेद्वारे महिलांचे सबलीकरण करण्याची नियोजन आहे. महिलांना घरात सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे महिलांना कसा वागाव कसा बोलावं कोणते कपडे परिधान करावेत हे निर्णय समाजाने किंवा घरच्या घरी येण्यापेक्षा ते घेण्याचा स्वातंत्र्य महिलांना मिळाला पाहिजे महिलांना स्वयंनिर्णाचा अधिकार हेत असला पाहिजे. त्याकरता राज्य सरकारने निर्णय घेतला की अडीच कोटी महिलांना जुलैपासून दीड हजार रुपये त्यांच्या ठरवलेलं आहे. जुलै आणि ऑगस्टचे पैसे 19 तारखेला रक्षाबंधन 17 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये झालेले असतील त्याकरता 6000 कोटीच्या फाईलवर सही केली आणि मग मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. 108 कोटी रुपये वर्षाला कोपरगावच्या महिलांच्या हातात वर्षभरामध्ये पडणार आहे. कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये पैसा खर्च करणार आहे. वर्षभरात 46000 कोटी रुपये मार्केटमध्येच येणार त्याच्यातून तुमच्या माझ्या राज्याची अर्थव्यवस्थेला गती मिळणारे आहे. अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतलेला ही योजना आहे . विरोधक टीका करतात. मात्र विरोधकांनी सरकारमध्ये असताना दीड रुपया देखील दिला नाही .दीड हजार रुपये द्यायला दानत लागते हे काही येड्या गबाळ्याचे काम नाहीये. हे सगळं करत असताना अर्थव्यवस्था कुठे मी अडचणी करून देणार नाही विकासाच्या कामाला कुठे निधी कमी पडू देणार नाही . विरोधक म्हणतात की आता राज्य अडचणीत येणार अजिबात अडचणीत येणार नाही त्याच्यातून ही योजना कायमची चालणार आहे हे आता जुलै ऑगस्ट पैसे मिळाले ते सप्टेंबर ऑक्टोबरचे पुढे पैसे मिळणार आपल्याला योजना चालू ठेवायची पण ती चालू ठेवण्याच्या करता पुढं आमच्यासारखी माणसं तिथं गेली पाहिजे. आशुतोष काळे यांना महायुतीने तिकीट दिल तर त्याना तुम्ही निवडून दिलं पाहिजे. येथील जनतेचा आज उत्साहात पाहण्यासारखा होता . आज काही लोकांच्या मनात कदाचित कोपरगावकरांच्याही मनामध्ये तो प्रश्न असू शकतो की अजित पवारांनी पहिले अडीच वर्ष सरकारमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काम केलं आणि त्याच्यानंतर मात्र सव्वा वर्षापूर्वी अजित पवार भाजप आणि शिवसेना यांच्याबरोबर का गेला आम्ही विकासाच्या करिता सत्तेमध्ये गेलो. जर सरकारमध्ये नसतो तर कोपरगावचे आमदार अशु तोष काळे 3000 कोटी रुपयांची काम करू शकले असते काय ?
पहाटे पाच वाजता पासून अजित पवार तयार असतो कामाला ते उशिरापर्यंत अकरा बाराला आशुतोष काळे पट्ट्या माझ्याकडे सकाळ पहाटे पहाटेच काम घेऊन मला उठवायला आला म्हणजे किती वाजता आला आशुतोष काळेपट्ट्या माझ्यासारखाच आहे त्यामुळे त्याच्या मंजूर बंधारा दुरुस्ती करता 41 कोटी रुपये दिले . आद्य पुरुष एकलव्य ,वीर महाराणा प्रताप यांचे स्मारक तसेच क्रीडा संकुलास निधी देण्याचे यावेळी अजित पवार यांनी जाहीर केले. मात्र पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणार पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरीत वळवणार आहे. ज्यातून गोदावरी खोर्यातील तुट भरून काढण्यात येईल. यासाठी मोठ्या निधीची आवशकता आहे. आणि म्हणूनच केंद्रामध्ये असलेल्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे. लोकसभेला घडल ते विधानसभेत घडू नये. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला जनतेने बळी पडू नये. आणि महायुतीचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन पवार यांनी केले .
माजी आमदार अशोकराव काळे , आमदार आशुतोष काळे,रूपाली चाकणकर, सुरज चव्हाण, प्रमोद हिंदुराव, मच्छिंद्र बर्डे, चैताली काळे, कपिल पवार, धरम शेठ बागरेच्या, चित्राताई बर्डे, प्रतिभाताई शिलेदार, बाबासाहेब होते, संभाजीराव काळे, कारभारी आगवन, माधवीताई वाघचौरे, वैशालीताई आभाळे,महेमूद सय्यद, सुनील गुंगले, धोंडीराम होते सरला दीदी ब्रह्माकुमारी आदी उपस्थित होते.