तिरंगा मॅरेथॉन जामखेड मध्ये उत्साहात संपन्न

0

तिरंगा ध्वज घेऊन मॅरेथॉनमध्ये धावून केली जनजागृती.

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तहसील कार्यालय अंतर्गत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ११ ऑगस्ट रोजी तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर ,नायब तहसीलदार विजय इंगळे ,नायब तहसीलदार संजय काळे , डॉ पांडुरंग सानप ,प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट ,डॉ अशोक बांगर, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रा अविनाश फलके ,शिवनेरीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण मोरे, शिंदे बी एस, प्रवीण निमोनकर एनसीसी ऑफिसर गौतम केळकर ,अनिल देडे, मयूर भोसले, डॉ महेश घोडके ,डॉ संजय राऊत , डॉ प्रवीण मिसाळ , अभिनव काकडे ,तलाठी , सर्व स्वस्त धान्य दुकानदार ,तलाठी मंडळ अधिकारी ,तहसील कार्यालय विभाग ,नगरपरिषद विभाग सर्व स्टाफ ,शिक्षक ,विद्यार्थी एनसीसी कॅडेट आजी-माजी सैनिक, व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         तिरंगा मॅरेथॉन चा मार्ग तहसील कार्यालय- जय हिंद चौक -छत्रपती शिवाजी महाराज पेठ -संविधान स्तंभ -खर्डा चौक- बीड कॉर्नर- तहसील कार्यालय असा होता.  यावेळी सर्वांनी भारत माता की जय, हर घर तिरंगा घरघर तिरंगा, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा देऊन जनजागृती केली. समारोपदरम्यान तहसीलदार  गणेश माळी यांनी मार्गदर्शन करताना १३ ते १५ ऑगस्ट या दिवशी सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा तसेच सायकल रॅली व तिरंगा मॅरेथॉन मध्ये जामखेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला व उपक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.

        मॅरेथॉन मध्ये धावण्याचा वेगळाच अनुभव जामखेडकरांना मिळाला  त्यामुळे जामखेडकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here