पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्र, ओतूर येथील संशोधक विद्यार्थी प्रा.सुशांत रामनाथ मोकळ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची “अ स्टडी ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ इ-फाईलिंग सिस्टम अंडर इनकम टॅक्स विथ रिस्पेक्ट टू सॅलरीड इम्प्लॉयी इन द हायर एज्युकेशन इंस्टिट्युशन्स” या विषयातील पीएच डी. पदवी प्रा. डॉ. खंदारे मुकिंदा बळीराम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे साहेब, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रो.डॉ. एकनाथ मुंडे, डॉ. ज्योती किरवे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रशासकीय सेवक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच ओतूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, उपप्राचार्य डॉ. सोनावणे के. डी., उपप्राचार्य, डॉ. शिरसाठ आर. एन., माजी उपप्राचार्य आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. जी. एम. डुंबरे, विभागप्रमुख, डॉ. सुनील लंगडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रशासकीय सेवक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.