कोपरगाव : कोपरगाव शहरात येऊन खरोखर समाधान वाटले. रसिकांमधून मिळालेला उदंड प्रतिसाद हा खरोखरच उल्लेखनीय असून हे सहज शक्य झाले. केवळ आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच, आमच्यासारख्या कलाकारांचा आदर व मान सन्मान आमदार आशुतोष काळे यांनी केला. अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित वचनपूर्ती दहीहंडी सोहळ्यात केले.
तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या ३ हजार कोटींच्या विकास पूर्तीच्या कामांची दहीहंडी या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक २९ रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद कोपरगावकरंमडून मिळाला. कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील महिला नागरिक तरुण आबाल वृद्ध अशा अनेकांनी या कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला .
यावेळी आमदार आशुतोष काळे महिलांना उद्देशून म्हणाले की, मी तुमचा भाऊ आहे मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आपण कोणालाही घाबरायचे नाही, तसेच आपली लाडकी बहीण गौतमी पाटील यांनी जो अद्वितीय नृत्य अविष्कार त्यांनी व त्यांच्या समूहाने सादर केला त्याबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीने व मतदार संघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला रसिकांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याच जोश्यामध्ये आनंद लुटला. यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.