गोंदवले – विद्रोही सामाजिक संघटनेच्या वतीने दहिवडी येथील तहसिलदार कचेरीवर दि.४ रोजी सकाळी ११ वाजता विराट मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे सदर मोर्चा मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दलित नेत्यांनी केले.
गोंदवले खुर्द येथील सूरज शिलवंत याला आत्महत्तेस प्रवृत्त करणारे आरोपींना तात्काळ अटक करावी, महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने योग्य ते धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,माण तालुक्यातील गायराण जमिनीवरील बांधलेली घरे कायम करण्यात यावीत त्यास अतिक्रमण समजू नयेत, भूमीहीन कुटुंबासाठी व भटक्या समाजासाठी घरे बांधण्यासाठी गायराण मधील जमिन मिळावी व घर बांधण्यासाठी ३०००००रुपये मंजूर करावेत,विजबिलामध्ये दरमहा मिटरभाडे व स्थिर आकार लावून दिले जाते तो आकार व भाडे हे वर्षातून एकदा लावावा व अन्यायी वीज दरवाढ कमी करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देशात व परदेशात शिक्षणाकामी पूर्वीप्रमाणे केंद्र व राज्य सरकार मार्फत मिळणारी स्कालरशिपमध्ये वाढ करुन नियमित मिळावी, राज्य सरकारने मागासवर्गीय यांच्या विकासासाठी तरतूद केलेला निधी इतर विभागाकडे वर्ग करु नये .आदि मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
माण तालुक्यातील सर्व दलित बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्रोही संघटनेन केले आहे.सदर मिटिंगमध्ये गोंदवले खुर्द येथील सौ.रेश्मा शिलवंत,सौ.रुपाली शिलवंत, शैलेश शिलवंत, प्रविण अवघडे व मातंग, बौद्ध समाजातील तरुण उपस्थित होते