एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील कु. श्वेता लोणारी कुस्ती स्पर्धेत प्रथम

0

कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील कु. श्वेता भगवान लोणारी अकरावी कॉमर्स या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीने 50 किलो वजन गटात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे  जिल्हास्तरीय शालेय शासकीय  कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मैदानी खेळांचे अत्यंत महत्त्व आहे.

आत्मसात केलेले कौशल्य दाखविण्यासाठी खेळाडूंना स्पर्धेत सहभाग घ्यावा लागतो. यासाठी महाविद्यालयाचे भव्य असे क्रीडांगण आहे. याद्वारे खेळाडूंना सर्व सुविधा महाविद्यालय देत असते. या सुविधांचा लाभ घेऊन यश प्राप्त केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ काका शिंदे महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला भोर यांनी या विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. त्याचप्रमाणे कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.बाबासाहेब  शेंडगे ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य संजय शिंदे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब वाघ यांनीही तिचे अभिनंदन केले या स्पर्धेसाठी ज्युनिअर विभागाचे क्रीडा संचालक प्रा. कदम व सीनियर विभागाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. विशाल पवार यांनी तिला मार्गदर्शन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here