शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रातही संजीवनीची विजयी घोडदौड
कोपरगांव: कोळपेवाडी येथे घेण्यात आलेल्या १९वर्षाखालील तालुकास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण संघाविरूध्द ६- ० गोलने एकतर्फी विजय संपादन करून तालुक्यात अव्वल असल्याचे सिध्द केले, अशा प्रकारे संजीवनी ज्यु. कालेजची शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विजयी घौडदौड असल्याचे संजीवनी ज्यु. कॉलेजने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तालुक्यातील सहा ज्यु. कॉलेजच्या फुटबॉल संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यात अथर्व पानगव्हाणे याने तीन गोल, अथर्व जपेने दोन गोल व साईराज पवारने एक गोल करून विजयश्री खेचुन आणला. उपांत्य फेरीत संजीवनीच्या संघाने समता इंटरनॅशनल स्कूल विरूध्द ३ – ० गोलने विजय संपादित करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या संघातील खेळाडू आदित्य बाळासाहेब खर्डे, अथर्व योगेश जपे, श्रेयस चंद्रशेखर काजळे, श्रेयस बाबासाहेब पुणे, देवेंद्र हिरालाल जांगडा, अथर्व भागवत पानगव्हाणे, सारंग विष्णू सुराळकर, माणस मयुर चांदवडकर, धु्रव मिलिंद कुलकर्णी, भैरविंद्र रघुवीर सैनी, आदर्श गणेश रहाणे, साई योगेश भागवत, सुजल सुनिल गोंदकर, स्पंदन राहुल अमृतकर, साईराज विशाल पवार, अथर्व हर्षल भावसार व सत्यम ससतीश थोरात यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व क्रीडा प्रशिक्षक प्रा. अक्षय येवले यांचेही अभिनंदन केले.