शिक्षक दिन खरा
ईद पतेती दसरा
गुरू शिष्य संयोग
योग कुठला दुसरा…
वत्सल धेनू स्नेहे
जवळ घेते वासरा
गुरू स्वरूप ममत्व
वाहती बत्तीसधारा…
चिमणी बनून गुरू
अर्थ भरवी पाखरा
द्या शिक्षकासन्मान
शोभे हृदय मखरा…
सुगंध नेई दिगंतरा
पित्या समान वारा..
उच्च स्थानी शिष्य
गुरु मिळे मो दखरा…
लाभे जीवंत झरा
तहानल्या चकोरा
पोतडीत खूपकाही
नमस्कार जादुगारा….
शिक्षक भेट घडता
पहा मूर्तरूप ईश्वरा
सुख शांती शाश्वत
स्वर्ग मिळे नश्वरा…
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
2
शिक्षक (दिन) दीन ..
पापभिरू आम्ही सारे
मौनी शिक्षक बिचारे
घरापुढे जमली जत्रा
शिक्षकदिन आला रे..
फुले गुच्छ हार तुरे
खरोखर आता पुरे
नकोकोरडे पुरस्कार
पेमेंट आज तरी द्यारे…
ज्ञानदान हे काम खरे
का तेचं नेमके विसरे
इतर कामांचे ओझे
फालतू नसते नखरे…
ऑन लाईन शिक्षण
वाहू लागले नवे वारे
नेट स्पीड वीज नाही
शिकवायचे कसे बरे…
एक दिवसीय उत्सव
कशा साठी का नखरे
इव्हेंट परि पूर्ण होता
उडून चालली पाखरे….
स्वभाव शिक्षका तुझा
लाजवी माधुर्य साखरे
कर्तृत्व तव शब्दां पार
साष्टांग नमन लाख रे …
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..