अनिल वीर सातारा : भ.बुद्ध व त्यांचे शिष्य सारीतपुत मोगलयन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीधातु असलेला कलश रथ येत असल्याने विदेशी पाहुण्यांना राज्य अतिथी घोषित करण्यात आले आहे.अशी माहिती महाराष्ट्र शासन उपसचिव हेमंत डांगे यांनी दिली. सदरच्या दौऱ्यावेळी पोलीस संरक्षण व इतर अनुज्ञेय सुविधा प्रशासन देईल.याकामी, कृती समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी,सदस्य व प्रसिध्दीप्रमुख कार्यरत आहेत.
तेव्हा विविध संघटनांचे प्रतिनिधी,उपासक व उपासिका यांनी स्वागतासाठी उपस्थीत रहावे.सातारा येथे दि.११ तारखेला येणाऱ्या अस्थिकलशाचे स्वागत बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी करून बॉम्बे रेस्टॉरंट ते पुतळा परिसर इथपर्यंत मिरवणूक काढण्याचे ठरले आहे एक वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुतळा परिसरात अस्थीकलश ठेवण्यात येणार असून उपासक-उपासिका यांना वंदन करण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
सायंकाळी सहा वाजता नगरपालिका हॉलमध्ये धम्मदेशनेचा कार्यक्रम होणार आहे.अस्थीकलशबरोबर येणाऱ्या व्यक्तींचे स्वागत व व्यवस्था कृती समितीतर्फे करण्यात येणार आहे. अस्थिकलशाचे स्वागत हे कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली न करता साताऱ्यामध्ये सर्व उपासक व उपासिका तसेच प्रसिद्धप्रमुख यांच्यामार्फत करण्याचे एकमताने सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा. असेही आवाहनही धम्मबांधव यांनी केले आहे.