पैठण शहर आणि तालुक्यात सोनपावलांनी गौराईचे उत्साहात आगमन

0

पैठण,दिं१०.(प्रतिनिधी): पैठण शहर आणि तालुक्यात सोनपावलांनी गौराईचे उत्साहात आगमन झाले असून त्यांचे घरोघरी वाजत गाजत स्वागत करण्यात आले. विघ्नहर्ता गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला असून , या आनंदात आणखी वाढ करणाऱ्या गौरींचेही मंगळवारी ( दिं .१० ) रोजी घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले .

गौरी आणताना ‘ गौरी कशाच्या पाऊली आली , सोन्या- मोत्याच्या पाऊली आली ‘ , असे म्हणत गौराईला वाजत – गाजत उत्साहाच्या वातावरणात घरी स्थापना झाली . यासाठी महिला गेल्या काही दिवसांपासून विविध कामात मग्न होत्या. महिला सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी आतूर झाल्या होत्या . गौराईचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर गौरीला सजविण्यासाठी , तिला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेत आहेत . त्यामुळेच गौरींचे आगमन हा महिलांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला .

गेल्या चार – पाच दिवसांपासून घराघरांमध्ये मिष्टान्न तयार करण्याची लगबगही सुरू होती . घराघरांत गौरींची उत्साहात पूजा करण्यात येत आहे . या गौरींना बाजूबंद , लक्ष्मीहार , सुवर्णजडीत कंबरपट्टे , बोरमाळ , हार तसेच सोन्याचे विविध प्रकारचे दागिने घालून सजवण्यात आले . दुसऱ्या दिवशी बुधवार ( दिं .११ ) रोजी गौरींचे पूजन करण्यात येणार आहे . यावेळी काही घरा घरांत पुरणाच्या पोळीच्या नैवेद्यासोबत जेवणाचा बेत असून , वेगवेगळ्या कुटुंबांतील परंपरेनुसार गोड , तिखटाचा नैवेद्य गौराईला दाखवण्यात येतो .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here