येवला (प्रतिनिधी)
येवला पंचायत समिती (शिक्षण विभाग) राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक, शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती द्वारा संचलीत अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभेच्या वतीने येवला तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील हिंदी विषय शिक्षकांचे राष्ट्र भाषा हिंदी तथा राष्ट्र लिपी देवनागरी दिन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात साजरा होणार असल्याची माहिती येवला मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष व मुख्याध्यापक दिपक गायकवाड यांनी दिली आहे.
राजभाषा हिंदी-राष्ट्र लिपी देवनागरी लिपी दिवस शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वा.संपन्न होणार आहे. येवला पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संजय कुसाळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षण विस्तार अधिकारी मारवाडी साहेब असणार असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक दिपक गायकवाडसर,राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापक भारती तथा अखिल भारतीय हिंदी अध्यापक सभा संस्थेचे संस्थापक शरद शेजवळ,ज्ञानेश्वर भागवत,पी.जे.बारे,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,अनकई,ता.येवला चे सर्व मुख्याध्यापक कर्मचारी प्रयत्नशील आहेत. येवला तालुक्यातील सर्व हिंदी विषय शिक्षक,शिक्षिकानी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रकपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय,अनकईच्या हिंदी विभाग प्रमुख प्रतिभा सोनवणे यांनी केले आहे.