आ. आशुतोष काळेंच्या रूपाने महिला भगिनींची काळजी घेणारा भाऊ मिळाला !

0

कोळपेवाडी वार्ताहर :- आ. आशुतोष काळे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजासहजी मिळवून दिला आहे. दोन महिन्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी महायुती शासनाने ‘माझी लाडकी, बहिण योजना’आणली. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी महिला भगिनींना अडचणी येवू नये यासाठी कोपरगाव मतदार संघात सहाय्यता केंद्र उभारून या योजनेचा लाभ मतदार संघातील माता भगिनींना सहजपणे मिळवून देवून महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये देखील आले. आजपर्यंत एवढ्या कमी वेळात एखाद्या सरकारी योजनेचा सर्व माता भगिनींना लाभ पहिल्यांदाच आ.आशुतोष काळेंमुळे मिळाला आहे. त्यामुळे महिलांची काळजी घेवून त्याचे दु:ख जाणणारा आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला मिळाला असल्याचे पुणतांबा येथे आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांनी दिलखुलासपणे सांगितले.

‘गणेशोत्सवानिमित्त’ कोपरगाव मतदार संघात आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींचा अत्यंत आवडता असणारा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणतांबा तसेच वाकडी, चितळी, शिंगवे, नपावाडी, धनगरवाडी, रामपूरवाडी, जळगाव आदी गावातील महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी आ. आशुतोष काळे यांच्यासमवेत जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे उपस्थित होत्या.    

            यावर्षी बहिणी आ.आशुतोष काळेंना ओवाळणी देणार ———–

आ.आशुतोष काळेंच्या विकासकामांबाबत आम्ही महिला समाधानी तर आहोतच परंतु दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गुणवंताबरोबरच त्याच्या पालकांचा देखील गुण गौरव व सन्मान करून  पालकांपेक्षा जास्त त्या गुणवंतांचे आ.आशुतोष काळे कौतुक करतात हे आम्हा पालकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. दरवर्षी दिवाळीला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो परंतु यावर्षी मतदार संघातील तमाम बहिणी आ.आशुतोष काळेंना दिवाळीची वेगळीच ओवाळणी देणार असल्याचे सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समस्त महिला आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे शिंगवे येथील सौ. निकीता काळवाघे यांनी यावेळी सांगितले.

आजीबाईला देखील नाही आवरला मोह —-

उपस्थित हजारो महिलांपैकी असंख्य महिला स्पर्धेत सहभागी होत असतांना उपस्थित एका आजीबाईला देखील या स्पर्धेत देखील सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही व स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर झिंगाट गाण्यावर चांगलाच ठेका धरत आजीबाईने नृत्याची हौस पूर्ण करून घेतली.

यावेळी उपस्थित महिलांनी आ.आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांचे आभार मानतांना सांगितले की, कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला आकार देतांना आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील राहाता तालुक्यातील गावांना देखील विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले.त्यामुळे आमच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत जे रस्ते यापूर्वी होऊ शकले नाही त्या रस्त्यांचा विकास झाल्यामुळे आमच्या अडचणी सुटल्या आहेत. महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी स्वत:ची यंत्रणा कार्यरत ठेवली त्यामुळे असंख्य महिला लाभ घेवू शकल्या.भक्ती बरोबरच महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल आभार मानून आ.आशुतोष काळे मतदार संघातील माता भगिनींना अपेक्षित असलेले आमदार मिळाले असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना तसेच सलग्न संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात असंख्य महिलांनी सहभागी होवून या स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या सौ.मोहिनी पगारे यांना स्मार्ट टी.व्ही., द्वितीय विजेत्या सौ.रूपाली गायकवाड-मायक्रो ओव्हन, तृतीय विजेत्या सौ.भारती अहिरे-गॅस शेगडी, चतुर्थ बक्षीस सौ.पूजा लांडे-मिक्सर, पाचवे बक्षीस सौ.स्वप्नाली गायकवाड-टेबल फॅन, सहावे बक्षीस सौ.सरला शिरसाठ-इस्त्री, सातवे बक्षीस सौ.रूपाली पारखे-कुकिंग सेट, आठवे बक्षीस कु.पूजा धनवटे-लेमन सेट, नववे बक्षीस सौ.वर्षा धनवटे-स्टील डीनर सेट, दहावे बक्षीस सौ.विद्या सिन्नरकर-कप सेट या बक्षिसांचे वितरण विजेत्यांना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here