प्रतिनिधी नांदेड :
शहर व जिल्ह्यातील सर्वात उंच गणपती म्हणून प्रसिद्ध झालेल्या तारासिंह मार्केटमधील क्षत्रिय गणेश मंडळाने याही वर्षी ‘श्रीं’ची भव्य दिव्य मूर्ती बसवून भाविकांचे आकर्षण कायम ठेवले आहे. सदर श्री ची मूर्ती जवळपास २१ फूट उंच व १६ फुट रुंद असून बाजूलाच सिद्धीच्या आकर्षक मूर्ती लक्षवेधी ठरल्या आहेत.
यातील एक रिद्धीची मूर्ती भाविकांना उठून आशीर्वाद देते तर दुसरी सिद्धी ची मूर्ती दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या हातावर लाडू ठेवते तर उंच असलेल्या श्री मूर्तीच्या खालील बाजूस दोन मूषक आरती करताना दाखविण्यात आले आहेत.उपरोक्त संकल्पनेची श्रींची मूर्ती बनविण्यासाठी कलाकुसर करणाऱ्या सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागल्याचे सांगितले जाते. मूर्ती व तेथील देखावा पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. श्री क्षत्रिय गणेश मंडळाचे अध्यक्ष
अशोकसिंह हजारी, उपाध्यक्ष डॉ. रुपेशसिंह हजारी, कार्याध्यक्ष अनिलसिंह हजारी, कोषाध्यक्ष महेश हजारी, सचिव गणेश बंडे, उपसचिव वीरेंद्रसिंह हजारी, अवर सचिव अमितसिंह हजारी, सभासद जिनेन्द्रसिंह हजारी, दिनेशसिंह हजारी, तसेच हजारी, सुमेर, विशालसिंह हजारी, तनवीरसिंह हजारी यांच्यासह व्यापारी, हितचिंतक व भक्त जणांनी परिश्रम घेतले.