देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
गणेशत्सव व ईद मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक सालाबाद प्रमाणे घेतली जात होती.परंतू या वर्षी देवळाली प्रवरात शांतता कमिटीची बैठकीला खंड पडला आहे.पोलिसांनी देवळाली प्रवरात शांतता कमिटीची बैठक घेण्याचे टाळले आहे.हि बेठक न घेण्या मागचे कारण काय हे माञ अद्याप समजु शकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा शहरात गणेशत्सव व ईद मिलाद निमित्त गेल्या अनेक वर्षा गणेश स्थापनेपुर्वी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शांतता कमिटीची बैठक नगर पालिका सभागृहात बोलवली जात होती.या बैठकीचे नियोजन देवळाली प्रवरा पोलिस चौकी मार्फत केले जात होते.चाळीस हजार लोकसंख्येचे गाव असुन नगर पालिका असल्याने गणेश मंडळाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूकी बाबत पोलिसांकडून गणेश मंडळासाठी केलेले नियम काटेकोर प्रमाणे कसे पाळले जातील यासाठी शांतता कमिटीची बैठक बोलविली जात होती.
देवळाली प्रवरा शहरात मुस्लीमांची संख्या चांगल्या प्रमाणात असल्याने ईद मिलाद उत्सव शांततेत कसा साजरा होईल यासाठी गणेशत्सव व ईद मिलाद या दोन्ही उत्सवाची बैठक एकञित घेण्याची प्रथा होती.अनेक वर्षाची प्रथा माञ या वर्षी बंद पडली आहे.
गेल्या एक वर्षा पुर्वी देवळाली प्रवरा पोलिस चौकीतील पोलिसांच्या बदल्या तालुक्या बाहेर झाल्याने येथे नव्याने आलेले पोलिस माञ चौकीच उघडत नसल्याने या चौकीची असुन अडचण नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे. पोलिस चौकीत पोलिसच राहत नसल्याने यावर्षाच्या गणेशत्सव व ईद मिलाद या उत्सवाची बैठक झाली नसल्याचे कारण पुढे आले आहे.देवळाली प्रवराच्या चाळीस हजार लोकसंख्येची सुरक्षा राम भरोसे आहे.गणेशत्सव व ईद मिलाद उत्सवा बैठक न घेतल्याने गणेश मंडळातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज बैठक घेण्यात येईल
साला बाद प्रमाणे देवळाली प्रवरा नगर पालिका सभागृहात बैठक घेतली जात होती याची पुर्व कल्पाना नसल्याने बैठक झाली नसेल. गुरवार दि13 रोजी गणेशभक्त व ईद मिलाद दोन्ही समाजाची बेठक एकञ बोलविण्यात येईल असे राहुरी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.