राहुल गांधी यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला : नितिनराव औताडे

0

कोपरगावात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून कडून जाहीर निषेध..

कोपरगाव (प्रतिनिधी): काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी वक्तव्य केले. या वक्तव्याचा कोपरगावात शिवसेनेच्या वतीने वतीने आम्ही जाहिर निषेध करतो. दलितांच्या मतावर राजकारण करून अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा राहूल गांधी यांच्या वक्तव्याने समोर आला, असल्याचे प्रतिपादक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात काल स.११.०० वा. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी बोलताना शिवसेना  गटाचे जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे म्हणाले, या देशामधील दलित, मागास समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तरतूद केली. त्यासाठी मोठा लढा त्यांनी दिला. गेली ५० वर्षे काँग्रेस पक्षाने दलितांच्या मतांवर राजकारण केले. त्याच काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी हे अमेरिकेमध्ये एका मुलाखतीदरम्यान आरक्षण संपूष्ठात आणण्याची भाषा करताय, ज्या दलित समाजाने काँग्रेसला सत्तेवर बसवले, त्यांचा आदर ठेवण्याची जबाबदारी राहूल गांधी यांची आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप व महायुतीने चारशे पारचा नारा दिला तेव्हा काँग्रेस पक्षाने देशातील आरक्षण संपूष्ठात येईल अशी आफवा देशातील दलितांमध्ये पसरविली. त्यांची मते घेतली आणि आपले उमेदवार निवडून आणले. मात्र काही महिन्यानंतरच राहूल गांधी यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. 

महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे म्हणाल्या की, बहूजन समाज, इतर मागासवर्गीय समाज, भटक्या जाती या सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाचा अधिकार दिला आहे. या आरक्षणाला राहूल गांधी विरोध करीत आहे. त्यांनी आरक्षण बंद करू असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध करीत आहोत. 

आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे,महिलाआघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे,शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ,शहरप्रमुख अक्षय जाधव,अशोकराव नवले,अभिषेक आव्हाड,देवा लोखंडे,किरण गवळी,शिवाजी जाधव,मनिल नरोडे,शाहू आव्हाड,अविनाश उपध्ये,विनोद गलांडे,चेतन गोंदकर,स्वराज कराड अदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here