सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी दोन चोरट्याने काढली होती. यासंबंधी सविस्तर वृत्त असे, सुमारे चार महिन्यापूर्वी मॉर्निग वॉकसाठी जात असताना ओव्हाळ यांच्या गळ्यातील साखळी दोन इसमांनी बुलेटवरून येऊन घेऊन पोबारा केला होता.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तद्नंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांना पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले. याबद्धल सातारा पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या टीमचे आभार मानून अभिनंदन करण्यात आले आहे.