प्रतापगङ प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली व शाळा व्यवस्थापन चिखली यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी या स्पर्धा उपयोगी ठरत असतात. या वर्षी कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी गट व खुल्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली.शालेय विद्यार्थी गटात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर खुल्या गटामध्ये विद्यार्थ्यांचे पालक, गावातील ग्रामस्थ, शाळेची माजी विद्यार्थी त्याचबरोबर गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
सदर स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी गटात ईशानी हरिबा चव्हाण हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मीत विजय जाधव याने द्वितीय तर निलम सुनिल ढेबे हिने तृतीय क्रमांक संपादन केला. खुल्या गटामध्ये रोहित विजय जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मंगल विष्णू ढेबे यांनी द्वितीय तर सिंधुताई विठ्ठल जाधव व लता प्रवीण जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लहान गटामध्ये एकवीस स्पर्धक तर मोठ्या गटात तेरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात लहान स्पर्धक सहा वर्षाचा तर सर्वात वयाने ज्येष्ठ साठ वर्षाचा स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाला होता. एका स्पर्धेत आजीबाई व त्यांचा नातू यांनी सहभाग घेतल्यामुळे ही स्पर्धा आगळीवेगळी होण्यास मदत झाली. विजेत्या स्पर्धकांना शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रामचंद्र जाधव कोंडीबा दादा जाधव संतोष मोरे यांच्या वतीने सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण सचिन जगताप सर यांनी केले तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार त्याचबरोबर मयुरी जाधव यांनी प्रयत्न केले. विजेत्या सर्व स्पर्धकांचे संपतभाऊ जाधव, संतोषाअप्पा जाधव,सरपंच दिपाली पवार उपसरपंच नदीमभाई शारवान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिबा चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.