ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक नव्हे तर आता ग्रामपंचायत अधिकारी

0

ग्रामसेवक वर्गात आनंदी वातावरण

पैठण,(प्रतिनिधी): ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक नव्हे तर आता  ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक वर्गात आनंदी वातावरण.  ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या दोन्ही पदाचे एकच काम असल्याने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन वेग वेगळे पद रद्द करून एकच पट ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटने कडुन मागील खूप वर्षापासून करण्यात आलेली होती त्यानुसार आत्ता दोन्ही  पदाचे एकत्रीकरण करून  एकच “ग्रामपंचायत अधिकारी” पदास शासनाने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली व आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

यामुळे पंचायत समिती पैठण अंतर्गत सर्व ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांनी झालेल्या निर्णयाचे स्वागत करून आनंद उत्सव व्यक्त केला यावेळी एकमेकांना पेढे भरवण्यात आले व शासनाच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचा अहोरात्र खूप दिवसापासून लढा सुरू होता त्या लढ्याला यश आले असून यासाठी राज्य अध्यक्ष संजीव निकम, राज्य सचिव सूचित घरात, राज्य कोषध्यक्ष दाणे पाटील यांनी कुशालाग्र नियोजन करून, आंदोलन, मोर्चा न करता शासनास परिस्थिती समजून सांगुन, मागणी मंजूर करून घेतली व शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल याबद्दल ग्रामसेवक राज्य पदाधिकारी व राज्य शासन यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

या निर्णयामुळे  वेतनामध्ये देखील या मुळे फरक पडणार आहे. या निर्णयाचे  पैठण  पंचायत समिती मध्ये फटाके फोडुन स्वागत करण्यात आले यावेळी प्रकल्प संचालक सिरसे ,विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पैठण ग्रामसेवक संघटना डिएनई १३६ चे तालुकाध्यक्ष  खंडू वीर, जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे सचिव सागर ,डोईफोडे, नितीन निवारे,रमेश आघाव, ईश्वर सोमवंशी ,मंचक भोसले, दशरथ खराद , प्रशांत पाटील,रजनीकांत पोकळे,  मापरी, राहुल वाघ, नामदेव दांडगे,राजपूत,कांबळे, विनायक इंगोले, संगीता दानवे,वर्ष औटे,  इंगळे,गव्हाणे, पाटील, मंदाकिनी मडके सह इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here