सातारा : बॅंक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले असले तरीही आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. या निस्वार्थ भावनेने आंबेडकरी चळवळीला वाहुन घेणारे व्यक्तीमत्व असणारे दादासाहेब केंगार आहेत.असे गौरवोद्गार रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल कदम यांनी काढले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रेजिमेंट दिन व जागतिक ज्येष्ट नागरिक दिनानिमित्त बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव दादासाहेब केंगार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.तेव्हा कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य सदस्य चंद्रकांत खंडाईत होते.
प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण विधी व प्रास्ताविक आबासाहेब दणाने यांनी केले. यावेळी मच्छिन्द्र जाधव व अन्य मान्यवरांनी अभिष्टचिंतनपर मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, सुनील निकाळजे,गणेश कारंडे, जगन्नाथ वाघमारे,होलार समाजाचे नेते दादासाहेब आवटे व मंगेश नामदास,हरिदास जाधव,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे बी.एल.माने, राष्ट्रोत्सवचे ऍड.विलास वहागावकर व अनिल वीर,अंकुश धाइंजे,अरुण जावळे,संजय नितनवरे, आदिनाथ बिराजे,डॉ.आदिनाथ माळगे,केंगार कुटुंबीय मित्र परिवार,आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.