कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची पावती त्याच्या बदलीच्या निरोप समारंभात मिळते

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 नोकरी कोणत्या क्षेञात करतो या पेक्षा आयुष्यात नोकरीचा पहिला दिवस व पहिला पगार आणि पहिली बदली विसरत नाही.त्या कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची पावती त्याच्या बदलीच्या निरोप समारंभात मिळते. नोकरीत असताना असे काम करा की त्या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर केले पाहिजे असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

        देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रतिनियुक्तीवर असलेले सुदर्शन जवक यांची श्रीगोंदा नगर पालिकेत कार्यालयीन अधिक्षक पदावर तर लेखापाल कपिल भावसार यांची जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर पालिकेत व  कार्यालयीन अधिक्षक नानासाहेब टिक्कल यांची इगतपुरी नगर पालिकेत बदली झाल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.लेखापाल म्हणून स्वप्निल फंड, अग्निशमन विभाग प्रमुख गोपाल भोर हे नव्याने बदलून आल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.

               

यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे म्हणाले की, चांगले काम केले तर सर्वांचे प्रेम मिळते.अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यावर प्रेम असावे लागते.अधिकारी ज्यांना काम सांगतात त्या कर्मचाऱ्याकडून कामाची अपेक्षा असते.कर्मचारीच विकास करु शकतात.100 कामगारांनी एकञ येवुन टाकलेले पाऊल म्हणजे विकास असे नवाळे यांनी सांगितले.

         

  स्वागत व कृतज्ञता कार्यक्रमात संभाजी वाळके,अभिषेक सुतावतणे,भुषण नवाल,दिनकर पवार,भास्कर जाधव,तुषार सुपेकर,सुभाष कुलट,उत्तम मुसमाडे,अजय कासार कृष्णा महांकाळ,राजेंद्र हारगुडे, सचिन सरोदे आदींनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तर नव्याने बदलुन आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले.सुदर्शन जवक,कपिल भावसार,नानासाहेब टिक्कल आदींनी कामकाज करताना आलेले अनुभव सांगितले.

           यावेळी सारंधर टिक्कल,अरुण कदम,राजेंद्र कदम,सुदर्शन जवक,गोरख भांगरे,राजेंद्र पोकळे,राजेंद्र थिगळे,रोहित पंडीत,सुदाम कडू,नागेश भालेकर,विजय साठे,दिपक भुमकर,ज्ञानेश्वर सरोदे,अमोल कांबळे,बाळासाहेब चव्हाण,बंडू आढाव, सुनिल खाटीक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन सुनिल गोसावी तर आभार प्रदर्शन उदय इंगळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here