कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढतांना उर्वरित ज्या ज्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे गरजेचे होते त्या रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून ३.५० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
सत्ताधारी पक्षाचा आमदार असलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेत कोपरगाव मतदार संघाच्या खराब झालेल्या सर्वच रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी अनेक रस्त्याचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करून सातत्याने पाठपुरावा करून मतदार संघाच्या रस्ते व पुलांसाठी जवळपास ७०० कोटी निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे निश्चितपणे रस्ते विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मोठी मदत झाली आहे.
मतदार संघातील प्रत्येक खराब रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सततचा पाठ्पुरावा असल्यामुळे या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध महत्वाच्या रस्त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून ३.५० कोटीच्या खर्चास प्रशासकीय मिळाली आहे. यामध्ये कोपरगाव मतदार संघातील मौजे वारी-बापतरा (इजिमा ०१) या रस्त्यासाठी ५० लक्ष, सावळगाव राधु पाटील उकिरडे घर ते राजेंद्र वाळूंज घर रस्ता करणे ५० लक्ष व कोकमठाण येथील इंटरनॅशनल स्कूल ते प्र.रा.मा.०८ ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी ५० लक्ष, एमडीआर ०८ ते बक्तरपूर गावापर्यंत रस्ता करणे ४० लक्ष, ओगदी ते उंदीरवाडी तालुका हद्द रस्ता (ग्रा.मा.७०) ४० लक्ष, काळे वस्ती ते कोळपेवाडी रस्ता (ग्रा.मा.२१) ४० लक्ष, मनेगाव ते तळेगाव रस्ता (ग्रा.मा.६३) ४० लक्ष, कोकमठाण ते माळवाडी प्ररामा ०८ ला जोडणारा रस्ता (ग्रा.मा.६८) ४० लक्ष, असा एकूण ३.५० कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रकिया पूर्ण होऊन रस्त्यांची कामे सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांना खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तत्ता होणार असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.