खून करणारा पती पोलिसात स्वतःहून झाला हजर..?
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे एका 35 वर्षीय पत्नीला पतिने संशयाच्या कारणातुन एका कुठल्यातरी टणक वस्तुने मारहाण करत खुन करण्यात आल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे समजते.
घटस्थापनेच्या दिवशीच पतिने पत्नीचा खुन करत तिला संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उर्मीला केशव लगे वय ३५ राहणार येवले आखाडा असे मयत महिलेचे नाव असुन केशव श्रीराम लगे वय वर्ष ४० असे खुन करणाऱ्या पतिचे नाव आहे.
राहुरी जवळील येवले आखाडा येथे मळहद्दी म्हणून ओळख असलेल्या परिसरात शेतकरी कुटुंब रहिवासी आहे.पत्नी उर्मिला व पति केशव लगे यांच्यात कायम कौटुंबिक कारणातून वाद होत असल्याचे चर्चेतून समजते. समजलेली माहिती अशी कि उर्मिला व केशव यांच्यात काल सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घरगुती कारणातून वाद झाला असुन सदर वाद हा आजूबाजूच्या लोकांनी व घरातील नातेवाईकांनी मिटीविला होता.
मध्यराञी घरातील सर्व जण झोपी गेलेले असताना मयताची १५ व १७ वर्षाचे दोन मुले असुन दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत झोपले होते. यावेळी पुन्हा रात्री ११ ते १२ वाजे दरम्यान दोघा पती-पत्नीमध्ये पुन्हा कुठल्यातरी वादातून थिनगी उडाली.
यामधे पति केशवने पत्नी उर्मिलाच्या डोक्यात कुठल्यातरी टणक वस्तूने बेदम मारहाण करत तिचा जागीच खून केल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले.
पति केशव याने पत्नी उर्मिलाचा खून करून पहाटे पाच वाजेपर्यंत झोपी गेला व पाच नंतर स्वतः राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन मी पत्नीचा खून केला असल्याचे त्याने कबुली दिली असल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,स.पो.नि. रविंद्र पिंगळे संदिप परदेशी,अमोल पवार, पी एस आय चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, पो काॅ सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, संदिप ठांणगे, संतोष राठोड,नदिम शेख,सचिन ठोंबरे, प्रविण आहिरे, गणेश लिपणे, रविंद्र पवार,गोवर्धन कदम, सतिश कुऱ्हाडे, अंकुश भोसले अदिसह ठसे तज्ञ यांनी घटनेच्या ठिकाणी पाचरण केले. मयत उर्मिला हिचा मृतदेह शविच्छेदनासाठी नगर येथे पाठविण्यात आल्याचे समजते तर आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहे.
खरं प्रकरण काय! पोलीसाचा छडा लावणार का..?
पतीने पत्नीचा नेमकं कोणत्या कारणातून खून केला? त्याने इतकी टोकाची भूमिका का घेतली.? यामध्ये काही नाजूक कारण असू शकते का? या घटनेमध्ये अजून काय उघड होणार? खून करताना अजून कोणी सामील होते का ? खरे प्रकरण नेमके काय याचा छडा पोलीस लावत आहे.