साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा ..

0

अनिल वीर सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६७ वा वर्धापन दिन येथील  शिवछत्रपतींच्या राजधानीमध्ये व माता भिमाईच्या जन्मभूमीमध्ये पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.           केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटन असणारा रिपब्लिकन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.ना. आठवले यांच्या आग्रहाखातर पहिल्यांदाच भिमाईंच्या जन्मभूमीमध्ये हा सोहळा करण्याचे आयोजन पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारणी यांनी केले होते. महाराष्ट्रामध्ये पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हाध्यक्ष अशोकराव (बापू) गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले.सदरच्या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी दुपारपासूनच कार्यकर्त्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.सर्वत्र हालगी,ढोल-ताशामध्ये पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते जयजयकार करीत सभास्थळी येत होती.सर्वत्र पक्षाचे निळे झेंडे सायंकाळची ४ ची वेळ होती.मात्र,कार्यकर्त्यांचा ओसंडुन उत्साह पाहायला मिळाला.

कार्यक्रम मात्र,६।।। ला सुरू झाला.रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालु होता.याकामी, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक असे परिश्रम घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य, पश्चिम,जिल्हा पदाधिकारी, युवा जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, प्रतीक गायकवाड,प्रदीप कांबळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड,जिल्हा महिलाध्यक्षा पूजा बनसोडे व त्यांच्या कार्यकर्त्या, सर्व तालुकाप्रमुख व कार्यकर्ते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here