कोपरगाव : ” विशाखा गाईडलाईन नुसार अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन झाली. त्यानंतर दिल्लीमध्ये घडलेले निर्भया किंवा अगदी अलीकडचे कोलकात्यामधील अपराजिता प्रकरण असेल या संदर्भात केंद्र शासन आणि संबंधित राज्य शासन खडबडून जागे झाले आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक कायदे करण्यात आले.” असे प्रतिपादन अॅड. राजश्री शिंदे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या वतीने ‘महिला सुरक्षितता व कायद्याचे ज्ञान’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान सत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
ऍड. शिंदे यांनी याप्रसंगी डोमेस्टिक वायलेंस ,प्रॉपर्टी राइट्स आधी महिलांच्या संदर्भातील विविध कायद्यांची विस्तृत माहिती देखील दिली. त्याचबरोबर महिलांसाठी कायदे करण्याची गरज आहे काय याचेही चिंतन विद्यार्थ्यांनी करावे असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करताना व्याख्यान सत्राला शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला. याच कक्षाच्या सदस्य डॉ.नीता शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर प्रा. कोमल अडसरे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. या व्याख्यान सत्राला विद्यार्थी विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद लाभला. या व्याख्यान सत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. जिभाऊ मोरे ,रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा.संपत आहेर, गणेश निरगुडे, रोहित लकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.