संजीवनी ज्यु.कॉलेज जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम

0

 संजीवनीची क्रीडा क्षेत्रात विजयी घौडदौड सुरूच
कोपरगांव: श्रीरामपुर येथे झालेल्या जिल्हास्तरीय  मुलांच्या पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी १९ वर्षे  वयोगटांतर्गत उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  करत अंतिम सामन्यात राहाता तालुक्यांच्या संघाविरूध्द ३ सेट पैकी २ सेट जिंकुन अहमदनगर जिल्ह्यात  अव्वल असल्याचे सिध्द केले. अशा  प्रकारे संजीवनी ज्यु.  कॉलेजची क्रीडा क्षेत्रात विजयी घौडदौड सुरू असल्याचे संजीवनी ज्यु. कॉलेजने आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
       

 या स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र  राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या मार्फत घेण्यात आल्या होत्या. संजीवनीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत श्रीगोंदा संघावर विजय मिळविला आणि दुसऱ्या  फेरीत श्रीरामपुर तालुक्याच्या संघावर विजय मिळवित तिसऱ्या  फेरीत प्रवेश  केला. तिसऱ्या  फेरीत अतिशय चुरशीच्या  सामन्यात राहाता तालुक्याच्या संघाविरूध्द अंतिम विजय संपादन करत जिल्ह्यात  अव्वल असल्याचे सिध्द केले.
संजीवनीच्या संघात कर्णधार अलिमोहम्मद फिरोज शेख याच्या नेतृत्वाखाली संयम आनंद पहाडे, आयुश पंकज शिंदे , ओम गणेश  जगताप, अर्णव संतोश आव्हाड, यश  सुरेष नरवडे, यश  कैलास जाधव, साई प्रविण धनवटे, नमन राजु शर्मा , श्रेयश  सुनिल देव, ऋषिकेश  बाळासाहेब देवकर व साद शहेबाज पठाण यांनी उतकृष्ट  खेळाचे प्रदर्शन  केले.
       

 आता संजीवनीचा संघ विभागीय सामन्यांमध्ये  अहमदनगर ग्रामिण जिल्ह्याचे  प्रतिनिधित्व करणार आहे. यात पुणे शहर, पुणे ग्रामिण, पिंपरी चिंचवड, सोलापुर शहर, सोलापुर ग्रामिण, अहमदनगर शहर व अहमदनगर ग्रामीण  असे सात संघ असणार आहे. तेथेही जिंकायचेच या इर्षेने  खेळाडू सराव करीत आहेत. त्यांना क्रीडा प्रशिक्षक शिवराज  पाळणे, दिपक कसाब, अक्षय येवले व गणेश  नरोडे यांचे मार्गदर्शन  लाभत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोेल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व  प्रशिक्षकांचेही अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here