आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, अश्विन शुक्ल पंचमी, ललिता पंचमी, सोमवार, दि. ७ ऑक्टोबर २०२४, चंद्र – वृश्चिक राशीत, नक्षत्र – अनुराधा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३२ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २१ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस स. १० नंतर चांगला दिवस आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, वृषभ व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवास टाळावेत. वाहने जपून चालवावित.
वृषभ : मनोबल उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्यावर असणारा मानसिक ताण कमी होणार आहे. विशेष उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. काहींना अनावश्यक खर्च करावे लागतील. मनोबल कमी राहील.
कर्क : प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रियजनांचा विशेष सहवास लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काहींना विविध लाभ होतील.
सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपण अत्यन्त आनंदी व आशावादी असणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील.
कन्या : जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आज आपण हाती घेतलेले काम यशस्वी होणार आहे. आपली जबाबदारी आपण योग्य रितीने पार पाडू शकणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
तुला : कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. गोडधोड जेवणाचा बेत कराल.
वृश्चिक : उत्साहाने कार्यरत रहाणार आहात. आनंदी व आशावादी रहाल. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.
धनु : मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. मानसिक नैराश्य जाणवेल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढतील.
मकर : आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम असणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. जिने मित्र मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
कुंभ : तुमचा प्रभाव वाढणार आहे. आजची आपली सर्व कामे तसेच आपली दैनंदिन कामे आपण विनासायास पूर्ण करु शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल.
मीन : अस्वस्थता कमी होईल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. काहींना आज एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. प्रवास सुखकर होतील.
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४