धम्मामुळे खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा वाढते : डी.एस.भोसले

0

सातारा : आधी केले मग सांगितले…..या न्यायाने खरीखुरी प्रगती होत असते.दोन दगडावरील पाय हा नुकसान टाकणारा असतो.तेव्हा धम्म का अधम्म एखदाचे ठरवावे. धम्मामुळेच वैयक्तिक व सामाजीक प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने प्राप्त होते.असे विचार माजी शिक्षणाधिकारी डी.एस.भोसले यांनी व्यक्त केले. 

      विकासनगर येथे डी. एस.भोसले भोसले यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा ते समारोपप्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले,”धम्म जाणायचा नसून बुद्धीच्या कसोटीवर मानायचा असतो.”

   

प्रथमतः भोसले कुटुंबियांनी महामानव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व कार्याध्यक्ष अनिल वीर यांनी दीपप्रज्वन करून अभिवादन केले.सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सरचिटणीस बी.एल.माने यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. स्वप्नाली राहुल भोसले यांनी गौत्तम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले.त्याचा सार बी.एल.माने व डी.एस.भोसले यांनी सविस्तरपणे कथन केले.भोसले यांनी स्वागत केले.

सदरच्या कार्यक्रमास निर्मला कांबळे, शोभा कांबळे, सुजाता कांबळे, सौ.संध्या जाधव, सौ. मल्लमा जानी, सौ.संध्या जाधव, विजया कांबळे,अशोक कांबळे, अशोक भोसले,ऍड. हौसेराव धुमाळ,प्रकाश सावंत, विश्वास सावंत,अशोक धाइंजे,राहुल दिलीप भोसले,कल्पना दिलीप भोसले आदी उपासक व उपासिका उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here